ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे रहस्यमय अपहरण, पोलिसांत गुन्हे दाखल

अहिल्यानगर

नगर शहरात दोन वेगवेगळ्या भागांतून दोन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याच्या खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. ही प्रकरणे गजानन कॉलनी (एमआयडीसी परिसर) आणि सावेडी पाईपलाईन रोड या ठिकाणी १८ आणि १९ जुलै रोजी घडल्याची माहिती आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींनी मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, गजानन कॉलनी परिसरात राहणाऱ्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी तिची पंधरा वर्षीय मुलगी घराजवळून अचानक गायब झाली. तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही, त्यामुळे अज्ञात इसमाने तिचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंवि कलम १३७(२) अंतर्गत कारवाई सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत, सावेडी पाईपलाईन रोडवरील पंधरा वर्षीय मुलगी १८ जुलै रोजी रात्री घरात झोपलेली होती. मात्र १९ जुलै रोजी सकाळी ती घरात दिसून आली नाही. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे कोणीतरी तिचं अपहरण केलं असल्याचा संशय बळावला. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांकडून या दोन्ही घटनांची सखोल चौकशी सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे