ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार , डॉक्टरची 14.66 कोटींची फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत निंबळक (ता. नगर) गावच्या शिवारात घडला आहे.

याबाबत डॉ. अनिल आठरे पाटील (वय 73, रा. झोपडी कॅन्टीन समोर, आठरे पाटील हॉस्पीटल, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून हा कट रचला.

संशयित आरोपींनी डॉ.आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या.

इतकेच नाही, तर बनावट मालक व खोटे लोक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून फिर्यादीला दस्त हस्तांतरित केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे