ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमध्ये कॅफेचा उद्योग चालूच..अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर

मोबाईलवर मेसेज पाठवून धमकी देऊन 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने सावेडीतील एका कॅफे हाऊसमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. ही घटना 7 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम फकिरमहंमद सय्यद (वय 27, रा. केडगाव वेशीजवळ, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपी हा त्याची मोपेड दुचाकी घेऊन कायनेटीक चौक येथे आला.

फिर्यादीला त्याच्या मोपेडवर बसवून सावेडीतील एका कॅफे हाऊस येथे फिर्यादीची इच्छा नसताना घेऊन गेला. तेथे त्याने फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि विकास काळे करत आहेत..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे