ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जातीचा दाखला अवघ्या ५०० रुपयात, नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार उघडकीस

नंदुरबार जिल्ह्यात ५०० रुपयात जातीचे दाखले देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झालीत. विविध योजनांसह विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. याचाच फायदा सायबर चालक घेत अवघ्या काही वेळातच हुबेहूब दाखला तयार करून देत नागरिकांची फसवणूक करत आहेत.

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळत नाही त्यामुळे पूर्ण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

तर काही आदिवासी बांधव शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचत नसल्याचे वस्तुस्थिती आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झालीत. विविध योजनांसह विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. लवकर दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी तसेच पालक तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत असतात. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील सायबर चालक विद्यार्थी आणि पालकांकडून ५०० रुपये घेत जातीचे दाखले देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील सायबर चालक विद्यार्थी तसेच पालकांकडून ५०० रुपये घेत, अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात बोगस कागदपत्रे तयार करण्याचे रॅकेट कार्यरत असून. याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

शासनाच्या अनेक योजना जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी गोरगरीब जनतेला जिल्हा किंवा तालुका स्तरावर यावे लागते. गावापासून दूर दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या अश्या आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे