ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी दिलासा, एलपीजी सिलिंडर स्वस्त, आजपासून नवीन दर लागू

लोकसभा निवडणुकीपूर्वी एलपीजीच्या किमतीत कपात केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन दरांनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे.

कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता 1879 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईबत सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे. तसेच, चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे