ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

महिलांसाठी उपलब्ध करून दिली स्वतंत्र बाजारपेठ- अभिनेता प्रशांत नेटके पाटील यांच प्रतिपादन..

अहमदनगर

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे मकर संक्रांती निमित्त आयोजित शाॅपिंग फेस्टिव्हलमध्ये सरप्राइज लकी ड्रॉ संपन्न झाला.

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित मकरसंक्रांती निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाले.‌शनिवार , रविवार सकाळपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत गर्दी चालू होती.

शनिवारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व ४५ स्टॉलधारक यांना सर्टिफिकेट आणि ट्राॅफी देण्यात आली. तसेच रविवार संध्याकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील यांच्या हस्ते समारोप व लकी ड्रॉ चा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी बोलताना अभिनेते प्रशांत नेटके पाटील म्हणाले की AR ग्रुपने महिलांनी महिलांसाठी एक स्वतःची हक्काची बाजारपेठच उपलब्ध करुन देऊन, खर्या अर्थाने त्यांच्या कलागुणांना व त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला एकाच जागी बाजारपेठ AR न्यूज लेडीज प्लॅटफॉर्म ग्रुप च्या वतीने निर्माण झाली. अशा पध्दतीचा हा खास लेडीज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल AR न्यूज लेडीज प्लॅटफॉर्म याच्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन यांचे अभिनंदन केले.

AR ग्रुप तर्फे लकी ड्रॉ कुपन काढून ३ विजेते जाहीर केले. विजेते नाव – १) विद्या खाटोडे २) रूतुजा देशमुख ३) कामिनी भास्कर अशा ३ जणी विजेत्या होत्या.

तसेच तनिष्क ज्वेलर्स कडून एक सरप्राइज लकी ड्रॉ कुपन देऊन १ विजेते जाहीर करण्यात आले होते.

विजेत्या जोडीचे नाव – कोमल राहुल म्हसके या जोडीला तनिष्क ज्वेलर्स कडून चांदीचे नाणे गिफ्ट मिळाले.‌ हे चांदीचे नाणे गिफ्ट देताना तनिष्क ज्वेलर्स चे मॅनेजर किरण सोनवणे व तनिष्क ज्वेलर्स ची टीम उपस्थित होती. तनिष्क ज्वेलर्स चे मॅनेजर किरण सर म्हणाले की AR न्यूज चॅनल च्या श्रुती मॅडम नी आम्हाला संधी दिली त्या बद्दल त्यांचे धन्यवाद मानले.

या वेळी AR ग्रुप कडून,सिने अभीनेता प्रशांत नेटके पाटील यांचा व तनिष्क ज्वेलर्स च्या टीम चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कवी दशरथ चौरे उपस्थित होते.

यावेळी AR ग्रुप च्या मुख्य संचालीका सौ श्रुती बत्तीन – बोज्जा, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर,सौ.अंबीका बत्तीन, संचालक अभिजीत बोज्जा उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे