अनामप्रेम संस्थेतील विद्यार्थी राहुल बबन पेटारे याचा IWRफाउंडेशन, जमशेदपूर, झारखंड या संस्थेकडून INDIAS WORLD RECORDS या पुरस्काराने सन्मान
अहमदनगर प्रतिनिधी - रोहित गांधी

अनामप्रेम संस्थेतील विद्यार्थी राहुल बबन पेटारे याचा IWRफाउंडेशन, जमशेदपूर, झारखंड या संस्थेकडून INDIAS WORLD RECORDS या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
राहुल हा एका हाताने टाळी वाजवतो, या रेकॉर्डसाठी त्याने एका हाताने सलग 15 मिनिटे वेगवेगळ्या प्रकारे टाळी वाजवून दाखवली. राहुल याचा आज संस्थेतर्फे श्री अभय रायकवाड, अमृत भुसारी, आनंद माळवे, विशाल निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष श्री अजित माने सर उपस्थित होते. त्यांनी राहुलचे पुरस्कार मिळाल्याबाबत खूप कौतुक केले व राहुलने एका हाताने टाळी वाजत नाही ही म्हण खोटी ठरविली असे सांगत राहुलला व संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांना नवनवीन छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांपैकी सौरज शिंदे, शत्रुघ्न घाटगे, सक्षम धोटे, द्वारका जोरवर यांनी देखील राहुलचे पुरस्कार मिळाल्याबाबत अभिनंदन करून छोटेखानी भाषणे दिली.