
नवीन रेशनकार्ड देणे, रेशनकार्डातील नावे ऑनलाईन करणे, रेशनकार्डातून नाव कमी करणे, नवीन नाव दाखल करणे, नावात दुरुस्ती करणे, अशा कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात गेल्या वर्षभरापासून हेलपाटे मारावे लागत आहेत.
ऑनलाईनला वेबसाईट चालत नाही, पिवळे रेशनकार्ड शिल्ल्क नाही, मनुष्यबळ नाही, रेशनकार्ड मिळणार आहे, अशी कारणे सांगितली जातात. वर्षभरापासून सुमारे पाचशे लाभार्थी रेशकार्डसाठी चकरा मारीत आहेत.
आयुष्यमान भारत आरोग्यकार्ड काढण्यासाठी शेकडो नागरीक तहाील कार्यालयात रेशनकार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पाथर्डीत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अनेक अडचणी सांगितल्या जातात.
पिवळे रेशनकार्ड गेल्या चार महिन्यांपासून शिल्लक नाहीत, त्यामुळे नवीन रेशनकार्ड दिलेले नाहीत. आम्ही पिवळ्या रेशनकार्डाची मागणी जिल्हा पुरवठा विभागाला केली आहे. आता नव्याने ईरेशनकार्ड मिळणार आहेत, त्यामुळे थांबावे लागेल, असे सांगितले जाते.
गेल्या जानेवारी २०२३ मध्ये ऑनलाईनसाठी अर्ज दिलेले रेशनकार्ड आजही ऑनलाईन झालेले नाहीत. ऑगस्ट महिन्यात येथे नव्याने हजर झालेल्या डोळे यांनी यापैकी काही कामे केली आहेत. १२५४ अर्ज निकाली काढले आहेत.
सध्या रोज १०० ते १२५ अर्ज दाखल होत आहेत. महसूल विभागाची साईड दिवसभर चालत नाही. रात्री उशिरापर्यंत थांबुन काम केले तरी २५ लोकांची कामे होतात. तरीपण रेशनकार्ड काढणे व इतर कामे करण्यासाठी सध्या दलालांची चलती आहे.
दलालांमार्फत गेल्यास कामे लवकर होतात. सामान्य माणुस मात्र हेलपाटे मारीत आहे. जो पैसे देईल त्याचे काम लवकर होते. पैसे देवुनही काम होईल, याची शास्वती कोण देणार? यावर कोणाचाही वचक नाही.
लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही. महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक नाही. दलालांनी वेढा घातलाय. काही सेतू चालक रेशनकार्ड तयार करण्यासाठी १५०० ते २००० रुपये घेततात. एजंटगिरी वाढली आहे. जो देईल त्याचे काम होईल, अशी अवस्था आहे.
माझे रेशनकार्ड जानेवारी २०२३ मध्ये काढले आहे. ऑनलाईन करण्यासाठी माझे रेशनकार्ड दिलेले आहे. वर्षभरानंतर मला सांगितले की, तुमचे नाव वडीलांच्या कार्डातुन ऑनलाईनमधुन डीलीट झालेले नाही. ते कसे करायचे तर शेवगावला जावे लागेल. मला रेशनकार्डातुन नाव कमी केल्यावरच नवीन रेशनकार्ड दिलेले आहे. मला ऑनलाईन करुन मिळावे, ही विनंती आहे. – प्रियंका आमोल वाघ, तिसगाव, लाभार्थी रेशनकार्ड
पिवळे रेशनकार्ड तिन महिन्यांपासुन शिल्लक नाहीत. आम्ही नगरला मागितले आहेत. नवीन ईरेशनकार्ड दिले जाणार आहेत. दवाखान्याच्या कामासाठी आम्ही दाखला देतो. नवनी माणसे नेमली आहेत. त्यांचे कोड निघालेले आहेत.
दोन दिवसांत ईरेशनकार्डचे काम सुरु होईल. ऑनलाईनच्या कामात अडचणी आलेल्या आहेत. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी ऑनलाईनला गर्दी वाढत आहे. – ज्योती अकोलकर, तालुका पुरवठा अधिकारी, पाथर्डी