
यंदा वातावरणाचे चक्र फिले आहे असे प्रत्येकाच्या तोंडी येत आहे. एल निनो वादळाचा हा परिणाम असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. पावसाळा संपून हिवाळा लागला अन गुलाबी थंडी हवीहवीशी वाटू लागली.
परंतु थंडी पडण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध भागात काल दि.२६ नोव्हेंबर जोरदार पाऊस झाला.
अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव, नगर शहर व नगर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.