ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहरात बुरखाधारी महिलांनी ३ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लांबविले

अहमदनगर

नगर सावेडीतील कोहिनूर मॉलमधील कल्याण ज्वेलर्स येथून दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाखांचे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे दागिने, असे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

याच महिलांनी आधी शिंगवी ज्वेलर्स येथेही चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सेल्समन पूजा शाम जगताप यांनी मंगळवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता दोन बुरखाधारी महिला दागिने पाहण्यासाठी दुकानात आल्या होत्या. त्यांनी सोने खरेदी करायचे असल्याचे सांगून नेकलेसची मागणी केली.

यावेळी सेल्समन पूजा जगताप या त्यांना दागिने दाखवत होत्या. जगताप यांची नजर चुकवून त्या दोन महिलांनी तीन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला.

रिक्षातून आल्या होत्या

महिला बुरखाधारी महिला या रिक्षातून दुकानात आल्या होत्या. दुकानात चोरी केल्यानंतर त्याच रिक्षातून त्या पसार झाल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रिक्षाही दिसून आली.

मात्र, त्यावरील क्रमांक दिसत नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहरातील दोन-तीन दुकानांमध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली होती. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत बुरखा घालून चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पुन्हा शहरात कार्यरत झाल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे