ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासाला गती दिली – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर

अहमदनगर शहरातील सर्वच भागामध्ये कायमस्वरूपीची विकासाची कामे नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने मार्गी लागावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही.

नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या आधी जमिनी अंतर्गत ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून घेतली आहे. त्यामुळे रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही.

शहरातील बहुतांश भागामध्ये रस्ता कॉक्रिटीकरण्याची कामे सुरू आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासाला गती दिली आहे. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावत आहे शहर विकासाच्या कामासाठी नगरकरांची साथ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पाईपलाईन रोड यशोदानगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, शिवाजी साबळे, अर्चना देवळालीकर, बाळासाहेब बारस्कर, सुरेश बनसोडे, योगेश ठुबे, सतीश बारस्कर, तुषार यादव, राजू तागड, शिवाजी डोके, शिवाजी साबळे, गणपत धाडगे, माउली घोडके, काका सावेडकर, विजय घाडगे, कुलदीप भिंगारदिवे, शशांक वाघ, अशोक गोरे, बाबसाहेब गीते, प्रशांत पाटील, अकुल कुदनर, संकेत पुजारी, किरण बारस्कर आदी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे