ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एमआयडीसीत तब्बल १ कोटीची लाच घेताना पकडला अधिकारी

अहमदनगर

अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.3) सायंकाळी रंगेहात पकडले.

अमित गायकवाड (वय 32 वर्ष,रा.नागापूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) रोजी पहाटे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ व सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते.या कामाचे २ कोटी ९९ लाख रुपये बिल होते.या बिलाची ठेकेदाराने मागणी केली.तेव्हा मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल एक कोटींच्या लाचेची मागणी केली.

दरम्यान ठेकेदाराने नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाला कळविले.ही रक्कम शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले.त्यानुसार गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला.

त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले.त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले.रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. या प्रकरणी गायकवाड यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे