ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नवरात्रीत कार्यक्रमाला फिल्मी कलाकार आणण्यापेक्षा प्रवचनकार , समाजसेवक आणा- सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

अहमदनगर

नवरात्रीत कार्यक्रमाला फिल्मी कलाकार आणण्यापेक्षा प्रवचनकार,समाजसेवक आणा- सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा.अशा कार्यक्रमांना पोलीस प्रशासनानेही परवानगी देऊ नये.

सध्या नवरात्री उत्सव सुरु असून अनेक मंडळे गर्दी होण्यासाठी हिरोईन, टी व्ही कलाकार, रिल्स ऍक्टर आणतात त्याचा फायदा ना मंडळाना होतो ना समाजाला उलट या मुळे देवीचे पवित्र्य राखले जात नाही.

नवरात्रीचे पवित्र्य राखायचे असेल तर समाज प्रबोधनकार किंवा समाजसेवक आणून समाज प्रबोधन होईल असे कार्यक्रम घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

नवरात्री उत्सव हे धार्मिक उत्सव असून अनेक मंडळाकडून याचे पवित्र्य राखले जात नाही, दारू पिऊन कार्य केले जाते, उत्सवा मध्ये अनेक टी व्ही कलाकार, रिल्स ऍक्टर आणून कार्यक्रम घेतले जातात या मुळे देवीचे कोणतेही पवित्र्य राहत नाही व या गोष्टीमुळे अनेक अनर्थ घडल्याचे प्रामुख्याने दिसून येते, या साठी समाज प्रबोधन व्हावे, समाजाला धार्मिक व सामाजिक फायदा व्हावा या उद्देशाने गीत रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानेश्वर यांच्यावर आधारित नाट्य आणुन समाज प्रबोधन करावे. जर हे कार्यक्रम बिग बजेट असेल तर कमी बजेट वाले एकपात्री अभिनय करणारे अनेक कलाकार आहेत त्यांना आणून माँ जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे बाबत कार्यक्रम घेतल्यास मोठया प्रमाणात समाज प्रबोधन होऊन नवरात्री चे पावित्र्य ही राखले जाईल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.

जी मंडळे फिल्मी कलाकार, टी व्ही ऍक्टर, रिल्स ऍक्टर आणून कार्यक्रमे घेतील त्यांना प्रशासनाने ही परवानगी देऊ नये व समाजानेही अश्या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा असे आवाहन बोज्जा यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे