ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी

पुणे - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून, यंदा राज्यातील एकाच शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे.

शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते.

पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा मंत्रालयाकडून देशभरातील ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत.

गेली काही वर्षे राज्यातील किमान दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळत होता. मात्र यंदा राज्यातील एकमेव शिक्षकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे