ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील 540 शाळांचे त्रयस्थ मूल्यांकन होणार

महाराष्ट्रातील निवडक ५४० शाळांचे NABET-QCI संस्थेमार्फत त्रयस्थ मूल्यांकन केले जाणार आहे. SQAAF अंतर्गत ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक पारदर्शक आणि काटेकोर तपासण्यासाठी राज्यातील ५४० शाळांची निवड त्रयस्थ मूल्यांकनासाठी करण्यात आली आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या कामाची जबाबदारी ‘NABET-QCI’ या शासकीय स्वायत्त संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून पुढील ६० दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे.

गुणवत्तेची चाळणी कशी झाली?

1) त्रयस्थ मूल्यांकनासाठी निवडलेल्या ५४० शाळांची यादी टप्प्याटप्प्याने गाळणी करून निश्चित करण्यात आली आहे. त्यामागची आकडेवारी पुढीलप्रमाणे

2) मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये राज्यातील एकूण १,०२,६७५ शाळांनी आपले स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले होते.

3) स्वयं-मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांमधून २०२५-२६ मध्ये १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले.

4) बाह्य मूल्यांकनातील सर्वोच्च गुणांकनाच्या आधारे ५४० शाळांची त्रयस्थ तपासणीसाठी निवड झाली.

5) या ५४० शाळांमध्ये ‘अ+’ श्रेणीतील ४२८ शाळांचा समावेश आहे.’अ’ श्रेणी मिळवलेल्या १,०६७ शाळांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ११२ शाळांचीही या यादीत निवड करण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान प्रशासकीय शिस्त आणि औपचारिकता जपण्यावर भर देण्यात आला आहे. मूल्यांकनासाठी पथक शाळेत आल्यानंतर कोणताही सत्कार समारंभ किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्याध्यापकांना देण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पुण्यात राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची स्थापना केली. त्याच दिवशीच्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार SQAAF आराखडा लागू करण्यात आला.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन, बाह्य मूल्यांकन आणि त्रयस्थ मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यामागे आहे.

या सर्व प्रक्रियेसाठी ०२०-२४४७८१२२ हा संपर्क क्रमांक आणि `sqaafmh@maa.ac.in` हा ईमेल आयडी परिषदेकडून देण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे