ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

चेक न वटल्याप्रकरणी न्यायालयाने कर्जदाराला सुनावली शिक्षा

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती के. बी. कामगौडा यांनी धनादेश अनादरित (Cheque Bounce) झाल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील दाढ येथील कर्जदार आरोपी सतीश रावसाहेब चव्हाण यांना नुकतीच कठोर शिक्षा सुनावली आहे.

चव्हाण यांनी साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या दाढ शाखेकडून ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र मुदतीत परतफेड न झाल्याने थकीत वसुलीसाठी त्यांनी संस्थेला आयडीबीआय बँकेचा १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.

हा धनादेश बँकेत न वटल्याने संस्थेने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट कलम १३८ अन्वये न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.

सुनावणीदरम्यान पुरावे व साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट म्हणजेच २ लाख २ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आणि रक्कम न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाचे आदेश दिले आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे