ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पुरुषप्रधान क्षेत्रात महिलेची उत्तुंग भरारी – अहिल्यानगर जिल्ह्यातील गौरी कासार..

वाळकी येथील रहिवासी असलेल्या गौरी गणेश कासार या महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्या स्वतः उंच विजेच्या खांबावर आणि रोहित्रावर चढून वीजवाहिनी दुरुस्तीची जोखमीची कामे अत्यंत धाडसाने करतात.

अहिल्यानगर शहरातील गंज बाजार कक्षात सध्या त्या आपले हे कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीशी सामना करत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर गौरी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) ‘इलेक्ट्रिशियन’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या महावितरणमध्ये रुजू झाल्या.

महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सिद्ध करत, तातडीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्या कोणतीही भीती न बाळगता जीवावर उदार होऊन काम करता.त

या कठीण आणि आव्हानात्मक प्रवासात पती गणेश शिवाजी कासार आणि संपूर्ण कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा तसेच नागरिकांचे कौतुक त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे