ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

चोरीची तक्रार द्यायला गेला आणि स्वतःच अडकला..

अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील केडगाव उपनगरात घरफोडीची खोटी तक्रार देणाऱ्या आदर्श ज्ञानदेव तनपुरे (वय २५) या फिर्यादीलाच कोतवाली पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे.

१७ नोव्हेंबरच्या रात्री ते १८ नोव्हेंबरच्या सकाळच्या दरम्यान केडगावच्या मराठा नगर येथील तानाजी मालुसरे अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख २५ हजार रुपये रोख चोरून नेल्याची फिर्याद आदर्श तनपुरे याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल चिटणीस व गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही, श्वान पथक व फॉरेन्सिकद्वारे तपास केला असता फिर्यादीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

चौकशीत समोर आले की, आई दिवाळीनिमित्त माहेरी गेल्यावर आदर्शने घरातील ही रोकड आपल्या एचडीएफसी बँक खात्यात भरून ‘एक्सएम’ डीमॅट खात्याद्वारे ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवली होती.

ट्रेडिंगमध्ये पैसे गमावल्याने घरच्यांना न सांगता त्याने घरफोडीचा बनाव रचला होता. पोलिसांनी त्याचे बँक विवरण व मोबाईल जप्त करून त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे