अहिल्यानगर महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील टिळक रोड ते नवीन टिळक रोडला जोडणाऱ्या कामगार भवन रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील टिळक रोड ते नवीन टिळक रोडला जोडणाऱ्या कामगार भवन रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संग्राम भैय्या जगताप याच्या हस्ते संपन्न झाले.
नगरसेविका सुजाता पडोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि माझ्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
प्रभागातील चारही नगरसेवकांनी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अहिल्यानगर शहरातील विविध विकासकामे नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी स्वरूपात मार्गी लागावीत, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

डीपी रस्त्यांपासून थेट कॉलनी परिसरातील रस्त्यांची कामे, तसेच विविध चौकांमध्ये आकर्षक शिल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही टिळक रोडला जोडणाऱ्या या कामगार भवन रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
यावेळी उपस्थित नागरिकांनी सत्कार करून विकासकामांचे स्वागत केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेविका सुजाता पडोळे, अनिता शेटीया, गोरख पडोळे, माजी नगरसेवक विपुल शेटीया, अजित जगताप, संदीप लोया, कुलकर्णी, वैद्य, कडूस, पवार, गोरक्ष पडोळे, सचिन दळवी, संतोष बांगर, अनिल कानडे, निलेश पडोळे, रोहित पडोळे, कांतीशेठ पटेल, तुषार शेठ पटेल, राजू एकाडे, शरद कोके, अतुल जाधव, राजाभाऊ कानडे, बाबू पाचारणे, रितेश सोनि मंडलेचा, प्रीतम तोडकर, अक्षय गाडळकर, विकी कानडे, सिद्धांत जाधव, वंदनाताई पडोळे, कल्पनाताई पडोळे, जाधव ताई, कारखले ताई, हंसराज पटेल, मनोज लाटे, संतोष टेके आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




