ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

घरात काम करणाऱ्या महिलेचा असाही विश्वासघात..

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील आनंदधाम समोरील अर्चना अपार्टमेंटमध्ये घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने ७८ वर्षीय वृद्ध महिलेची नजर चुकवून ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी फ्लॅट क्रमांक २ मधील रहिवासी लता रतनलाल बोरा यांनी सारसनगर येथील अंजली नावाच्या आरोपी मोलकरणीविरुद्ध फिर्याद दिली आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० वाजेच्या दरम्यान आरोपी महिला घरात काम करत असताना तिने संधी साधून बेडरूमच्या कपाटातील ६५ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या धातूचा बेल्ट असलेले मनगटी घड्याळ, ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि बेडवर ठेवलेला ५ हजार रुपयांचा नोकिया कंपनीचा मोबाईल असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

फिर्यादींनी वारंवार मागणी करूनही आरोपी महिलेने चोरी केलेला ऐवज परत न दिल्याने अखेर त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे