ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्हॉट्सअँपवर आलेली एक फाईल ओपन केली आणि बँक खात्यातून गायब झाले 10 लाख

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, आदर्शनगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त नागरिक एकनाथ विठ्ठल फापाळे (वय ५९) यांची अज्ञात सायबर चोरट्याने तब्बल ९ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही फसवणूक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५.४७ वाजल्यापासून ते २२ नोव्हेंबर रोजी रात्री २.२६ वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी घरी असताना घडली. अज्ञात आरोपीने फापाळे यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘महाराष्ट्र बँक लाईफ सर्टिफिकेट’ची बनावट एपीके फाईल पाठवली.

सेवानिवृत्त व्यक्तीची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने तांत्रिक हातखंडा वापरत आरोपीने त्यांच्या परवानगीशिवाय व बेकायदेशीरपणे मोबाईलचा संपूर्ण ताबा (ॲक्सेस) मिळवला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बचत खात्यातून वेळोवेळी रक्कम कपात करून एकूण ९,९५,००० रुपये लंपास केले.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर रोजी दुपारी सायबर पोलीस स्टेशन येथे अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे