ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ. सुजय विखेंच्या वाढदिवसानिमित्त राहत्यात मोठी सांस्कृतिक मेजवानी..

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता शहरात मंगळवार (दि. २४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता वीरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात ख्यातनाम कवी अनंत राऊत यांच्या भव्य काव्यसंध्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या उपक्रमात उपनगराध्यक्ष विजयराव सदाफळ, गटनेते मुन्ना शहा आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

राहाता शहरातील लोककला, साहित्य, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा अधिक बळकट करण्याच्या उदात्त हेतूने ही प्रबोधनपर काव्यमैफल आयोजित केली आहे.

या कार्यक्रमात ‘दुःख अडवायला…’, ‘मित्र वनव्यात गारव्यासारखा…’ आणि ‘भोंगा वाजला, भोंगा वाजला’ यांसारख्या लोकप्रिय कवितांमुळे परिचित असलेले संवेदनशील आणि रसिकप्रिय कवी अनंत राऊत आपल्या बहारदार कविता सादर करणार आहेत.

तरी, तरुणाईसह राहाता शहरातील सर्व रसिक नागरिकांनी या सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे