ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातील मोठ्या कॉलेजच्या समोर सुरू होते हुक्का पार्लर, पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर

अहमदनगर न्यु आर्ट्स कॉलेजच्या समोरच सुरू असलेल्या स्टार बर्ग हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली तोफखाना पोलिसांनी शनिवारी (दि. 21) सायंकाळी स्टार बर्ग हुक्का पार्लरवर छापा टाकून सहा हजार 775 रूपये किमतीचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले आहे.

हुक्का पार्लरचा मालक राम बापु भागवत (वय 23 रा. घासगल्ली, कोठला) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत याच्या स्टार बर्ग हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी छापा टाकून कारवाई केली होती. भागवतसह तिघांवर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भागवत याने काही दिवस हुक्का पार्लर बंद ठेवले होते. ते पुन्हा सुरू केल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, योगेश चव्हाण, सतिष त्रिभुवन, सतिष भवर यांच्या पथकाने छापा टाकला. भागवत याला ताब्यात घेत त्याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भागवत याच्या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल्यानंतरही त्याने कॉलेज समोरच पुन्हा हुक्का पार्लर सुरू केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे