आयुष्य मान कार्ड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला अहिल्यानगर शहरात बेड शिल्लक नाही – शिव राष्ट्र सेना
अहिल्यानगर - हॉस्पिटल तर रिकामे, मग 50, 50 काईल बोगस , आढळल्यास डॉक्टरांना व हॉस्पिटल ला काळे फासणार..

अहिल्यानगर शहरात मोठमोठ्या विविध हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्यमान भारत कार्ड रुग्णाकडे उपलब्ध असताना बहुतांशी दवाखान्यामध्ये असे सांगितले जाते की, या ठिकाणी बेड शिल्लक नाही तरी रुग्णाकडून खर्च म्हणून काही पैसे घेतले जातात. व नंतर रुग्णांना पूर्ण पैसे देण्याची ताकीद करतात तसेच या सवलतीच्या कोणत्याही कार्डचा व निधीचा उपयोग होत नाही असे बहुतांशीही आढळून आले.. चक्क शिवराष्ट्र सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्याला त्याच्या घरच्यांना घेऊन गेल्यानंतर हा अनुभव आढळून आला.
त्यामुळे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने विविध हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर असे आढळून आले की ,काही हॉस्पिटल वगळता इतर सर्व हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट नसून सुद्धा विविध योजनेतील फायली बोगस मारल्या जातात अशा हॉस्पिटलच्या विरोधात शिवराष्ट्र सेना त्या हॉस्पिटलला व डॉक्टरांना काळे फासणार असे शिवराष्ट्र सेनेकडून इशारा देण्यात आला..




