ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ऑनलाईन अ‍ॅपवर मैत्री, निर्जनस्थळी बोलावून लुटमार करणारी टोळी गजाआड

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील मोबाईलवरील ग्रिंडर अ‍ॅपव्दारे अनोळखी व्यक्तीशी मैत्री प्रस्थापित करून तिला भेटण्यासाठी निर्जनस्थळी बोलावून मारहाण करीत लुटमार करणार्‍या तिघांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले.

या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींकडून दुचाकी, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 2 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील एका व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीशी आरोपींनी मोबाईलवरील ग्रिंडर अ‍ॅपच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी लिंक रोड, केडगाव येथे भेटण्यासाठी फिर्यादीस बोलावण्यात आले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेले असता आरोपींनी संगनमत करून त्यांना मारहाण केली. एकूण 12 हजार 500 रूपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतली.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान हा गुन्हा यश मनोज भिंगारदिवे (वय 21, रा. संजयनगर, श्रीरामपूर), सिध्दांत दत्तात्रय जगताप (वय 22) आणि सुमित संजय गायकवाड (वय 22, दोघे रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) या तिघांनी केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे