ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे सह चौघांवर मोक्का – अहिल्यानगर जमीन व्यवहारात डॉक्टरची 15 कोटींची फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर-सावेडी येथील डॉक्टरांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती व खोटे मालक उभे करून तब्बल 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. सावेडी, अहिल्यानगर), अमोल बबन जाधव (रा. मोरगव्हाण, ता. नेवासा), महेश नारायण कुर्‍हे आणि भारत फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासा) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी डॉ. अनिल आठरे (रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून आपली फसवणूक करण्यात आल्याचे डॉ. आठरे यांनी फिर्यादीत नमूद केले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित स्वप्निल शिंदे, अमोल जाधव व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला.

सुरुवातीला त्यांनी डॉ. आठरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जमीन व्यवहारासाठी विविध मिळकती दाखविण्यात आल्या. मात्र, या मिळकतींबाबत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे