ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बालक मंदिर मध्ये माता पालक सभा संपन्न..

पर्यावरण संवर्धन हाच उद्याच्या भविष्याचा आधार

शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी बालक मंदिर महिला मंडळ शाळेत श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने माता पालक सभा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे बालक मंदिर महिला मंडळ शाळेमध्ये श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ व माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रोटरी प्रियदर्शिनीच्या नूतन अध्यक्षा रो . मा .सौ. प्रभा खंडेलवाल, तसेच सेक्रेटरी मा .सुरेखाजी मणियार या उपस्थित होत्या. तसेच रोटरीच्या सदस्या विभा तांबडे , सौ. मीनल गंधे, देविका रेळे, सविता काळे , अपूर्वा कुलकर्णी , यावेळी उपस्थित होत्या..

कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने झाली. याप्रसंगी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी केले. शाळेला लाभलेली बहुमोल पूर्वपरंपरा , शिक्षकांचे अमूल्य योगदान , विद्यार्थ्यांसाठी राबवणारे विविध उपक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील यश याबद्दल माहिती दिली.

पाहुण्यांचा परिचय श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी करून दिला. मंथन व एन एस ई मधील यशस्वी विद्यार्थी मिहीर घोटणकर व ज्ञानदा शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांनी बालक मंदिर महिला मंडळ शाळेला स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप केले. तसेच याप्रसंगी उपस्थित मातापालकांबरोबर शाळेच्या शिक्षिका सौ.पवार यांनी भावपूर्ण संवाद साधला. विद्यार्थ्यांचा जेवणाचा डबा, स्वच्छता, शिस्त, संस्कार ,गुड टच बॅड टच व आरोग्य जागरुकता तसेच शाळेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयांवर पालकांशी संवाद साधला.

यावेळी शाळेसाठी डिजिटल इंटरॅक्टिव बोर्ड व इतर काही साहित्याची आवश्यकता आहे असे शाळेच्या शिक्षिका सौ वैशाली सातपुते यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी पर्यावरण संवर्धन या विषयावर शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्तम पथनाट्य सादर केले . मुलांनी लेझीमचे सादरीकरण केले .त्याला सर्व मान्यवर उपस्थित व मातापालक ,मान्यवर अतिथी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बक्षीस दिले .

या कार्यक्रमासाठी महिला मंडळ शाळेचे उपाध्यक्षा डॉ.सौ. विद्या होळेहोन्नूर ,सेक्रेटरी श्रीमती ज्योती कुलकर्णी, खजिनदार मेधा धोपावकर , श्रीमती पुष्पा चितांबर ,सौ.गौरी मुळे, सौ. उमा देशमुख या उपस्थित होत्या.

याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणातून बोलताना सौ .ज्योती केसकर यांनी पथनाट्य व लेझीम सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आभार प्रदर्शन सौ. सीमा कवाष्टे यांनी केले .फलक लेखन श्रीमती अश्विनी मेंद्रे व सौ. सीमा कवाष्टे यांनी केले . सौ हेमांगी भिडे व सौ. ठकू पवार हळदीकुंकू, अत्तर लावून फुटाणे वाटप केले आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे