ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणानंतर आरोपींच्या घरांबाबत अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा..

अहिल्यानगर

मुकुंदनगर धीरज परदेशी हल्ला प्रकरणाला नवे वळण..आरोपींच्या घरांवर ग्रामपंचायतीची कारवाई? अनधिकृत बांधकामांचा ठपका..नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटिसा..

मुकुंदनगर परिसरातील मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणानंतर आता आरोपींच्या घरांबाबत ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती समोर आली आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीने संबंधित घरमालकांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नोटिसा संदर्भ क्रमांक २४/०६ आणि ०७/१०८ अन्वये जारी करण्यात आल्या आहेत. संबंधित बांधकामांबाबत ग्रामपंचायतीने नियमांनुसार कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केल्याचे दिसून येते.

दरम्यान, धीरज परदेशी यांच्यावरील हल्ल्यामुळे मुकुंदनगर परिसरासह अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आरोपींच्या घरांबाबत अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा समोर आल्याने या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे.

नोटिसा बजावल्यानंतर नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासन पुढे नेमकी कोणती कारवाई करणार? बांधकामांवर प्रत्यक्ष कारवाई होणार की संबंधितांना खुलासा आणि कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे