ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बेलापूरला जाताना भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचे निधन

मुंबई

एनआरआय वसाहतीकडून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून बेलापूरच्या दिशने जाणारी भरधाव होंडा सिटी कार रेल्वे पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात कार चालक साहिल वानखेडकर (२८) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे एनआरआय वसाहतीजवळ घडली.

वानखेडकर हा माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सीताराम घनदाट यांचा नातू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहिल वानखेडकर सानपाडा येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास तो कारने एनआरआय वसाहतीतून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेलापूरच्या दिशेने जात असताना झालेल्या अपघातात तो कारबाहेर फेकला गेला व गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवली. वानखेडकर इतक्या पहाटे कुठून कुठे चालला होता. याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.

सीताराम घनदाट हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अभ्युदय बँकेचे संचालक व सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव असलेल्या ‘घनदाट मामा’च्या प्रवेशामुळं राष्ट्रवादीला बळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे