ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळा ९ जुलैला राहणार बंद. शिक्षक संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर

शिक्षक अभियोग्यता परीक्षेने (टीईटी) निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण, बीएलओ नियुक्ती संबंधाने राज्य शासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी शिक्षक सामूहिक रजेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळा बंद ठेवणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यातच पेपरफुटी व शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे, संचमान्यता आदी विषय शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. यासंदर्भात सर्व संघटना प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सर्व शाळा बंद आंदोलनचा निर्णय झाला. याअनुषंगाने विविध शिक्षक संघटनांनी दि. ३० रोजी शासनाला नोटीस दिली आहे.

आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, राज्य खासगी शिक्षक सेवक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे