ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मेडिकल व्यावसायिकाची 5 लाख 50 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवत संगमनेर येथील एका मेडिकल व्यावसायिकाची 5 लाख 50 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी (23 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावबाकी रोड, संगमनेर परिसरात राहणार्‍या 46 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ते मेडिकल व्यवसाय करतात. त्यांना एका नामांकित डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची संगमनेर येथे फ्रँचायजी घ्यायची होती.

यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर दिसलेल्या एका जाहिरातीतील फॉर्म भरून माहिती दिली होती. त्यानंतर मयांक गुप्ता नावाचा व्यक्ती (पूर्ण नाव माहिती नाही) तसेच परमार नावाचा व्यक्ती आणि प्रियंका नावाच्या महिलेने फिर्यादीशी मोबाईलव्दारे संपर्क साधला. त्यांनी स्वतःला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध शुल्क, नोंदणी प्रक्रिया आणि फ्रँचायजी मंजुरीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एकूण 5 लाख 50 हजार रूपये उकळल्याचा आरोप आहे. पैसे भरल्यानंतरही फ्रँचायजी मिळाली नाही.

तसेच संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळेनासा झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणात आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडींचा वापर केल्याचे समोर आले आहे.

सदरचा प्रकार 20 मार्च 2026 ते 6 एप्रिल 2026 दरम्यान घडला असून फिर्यादीने 23 जून रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर ऑनलाइन माध्यमांवर दिसणार्‍या फ्रँचायजी, नोकरी, गुंतवणूक अथवा व्यवसायाच्या आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट, कार्यालय व संपर्क तपशीलांची खातरजमा करावी. कोणत्याही प्रकारचे शुल्क भरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे