
बुर्हाणनगर ते नागरदेवळे जाणार्या रस्त्यालगतच्या शेडमध्ये काही व्यक्ती विनापरवाना पैशांवर तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती भिंगार कॅम्पच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना मिळाली होती. त्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी शनिवारी (20 जून) पहाटे 1.20 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली असता संशयित जुगार खेळताना आढळून आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार भागवत जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात संशयित म्हणून दीपक प्रभाकर भगत (रा. बुर्हाणनगर), सुरज राजेंद्र चराटे, नवाज आलम शेख (दोघे रा. नागरदेवळे), रंजील जटाप्पा जाधव, धीरज बैजू सोळंकी, विकास बाळू वैरागळ, जाकीर कासम शेख, राहुल सुनील शिंदे, गणेश गोरख गाडेकर, महेश चव्हाण व आकाश भालसिंग (सर्व रा. बुर्हाणनगर) यांचा समावेश आहे. सहाय्यक निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.




