ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भागीदारी संस्थेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून 88 लाखांचे कर्ज ,व्यावसायिकाची फसवणूक..

अहिल्यानगर

भागीदारी संस्थेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून एका व्यावसायिकाला भागीदार दाखवत त्याच्या नावाचा वापर करून 88 लाख रूपयांचे वाहन कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी मुंबईतील व्यावसायिक रमेश हौशिनाथ पोखरकर (वय 50) यांनी बुधवारी (17 जून) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

विकास दशरथ पानसंबळ (रा. व्यंकटेश कॉलनी, म्हस्के मेडिकल कॉलेज, नागापूर, अहिल्यानगर), अतुल अरूण नलावडे (रा. सिध्दार्थनगर, कोपरी, ठाणे) व धिरज बालाजी तनपुरे (रा. शिंदे मळा, प्रेमदान हॉटेल, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी रमेश पोखरकर हे मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास असून ते व्यवसाय करतात. युनायटेड बायो एनर्जी प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून त्यांची अतुल नलावडे याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर रमेश पोखरकर, विकास पानसंबळ, अतुल नलावडे आणि उदय संपत पाटील (रा. सांगली) यांनी मिळून डिसेंबर 2021 मध्ये युनायटेड बायो एनर्जी प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली होती.

कंपनीच्या माध्यमातून सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र व्यवसायातील मतभेद आणि दबावाच्या वातावरणामुळे पोखरकर यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, ऑक्टोबर 2024 मध्ये उदय पाटील यांनी पोखरकर यांना संपर्क साधून एका भागीदारी पत्रकाची प्रत दिली. त्यावेळी या पत्रकात त्यांच्या नावाने करण्यात आलेल्या सह्या बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

युनायटेड एंटरप्राईजेस नावाची भागीदारी संस्था 12 ऑक्टोबर 2022 रोजी स्थापन करण्यात आल्याचे या कागदपत्रांमध्ये नमूद असून त्यामध्ये रमेश पोखरकर यांना 25 टक्के भागीदारी असलेला भागीदार दाखविण्यात आले होते.

विशेष म्हणजे, या संस्थेचे मुख्य कार्यालय नागापूर येथील व्यंकटेश कॉलनीत असल्याचे नमूद करण्यात आले असून या संस्थेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा पोखरकर यांनी केला आहे. तसेच संबंधित भागीदारी पत्रकावरील सह्या बनावट असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या कथित बनावट भागीदारी पत्रकाच्या आधारे अहिल्यानगर येथील गुलमोहर रोडवरील एचडीएफसी बँकेच्या शाखेत चालू खाते उघडण्यात आले. त्यानंतर 23 मार्च 2023 रोजी याच संस्थेच्या नावाने 88 लाख रूपयांचे व्यावसायिक वाहन कर्ज मंजूर करून घेण्यात आले.

या कर्जप्रकरणात पोखरकर यांच्या नावाची कागदपत्रे आणि सह्या वापरण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित कर्ज खाते आजही सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे