मा.आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘काका ट्रस्ट’ अन्नछत्रालय तसेच महारक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न
अहिल्यानगर

मा. आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना व कार्याला उजाळा देत, ‘काका ट्रस्ट’च्या वतीने अन्नछत्रालयाचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच मा. आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रेरणा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘महारक्तदान शिबिराला’ असंख्य रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रक्ताचे नाते नसतानाही माणुसकीच्या नात्याने रक्तदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे..

यासोबतच सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, स्व. काकांचे अनेक स्नेही, तसेच गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदनीय जैनमुनी अलोकऋषीजी महाराज आणि ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

स्व. अरुणकाकांनी नेहमीच अन्नदानाला आणि सामाजिक कार्याला महत्त्व दिले. त्यांचा हाच वारसा पुढे चालवण्यासाठी आणि गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने मार्केटयार्ड जवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालया समोरील नागेश्वर महादेव मंदिरात दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे अन्नछत्रालय अखंडितपणे सुरू राहील.

या सोहळ्याला श्रीमती पार्वतीबाई जगताप, महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व सुवर्णा जगताप, माजी नगरसेविका शीतल जगताप, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, राजेंद्र चोपडा, किशोर डागवाले, आणि हितेश ओबेरॉय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि स्व. काकांचे अनेक स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काकांचे विचार आणि कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत..




