ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात मनप्पुरम फायनान्सची 15 लाखांची फसवणूक

इतर बँकेतून सोने तारणावर घेतलेले कर्ज फेडण्याच्या बहाण्याने आणि बनावट पावत्या दाखवून मनप्पुरम फायनान्सची तब्बल 15 लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोल्हेगाव उपनगरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (18 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनप्पुरम फायनान्सचे एरीया हेड मॅनेजर सुजीतकुमार फौदारी प्रसाद (वय 29, रा. भाऊसाहेब फिरोदिया शाळेशेजारी, अहिल्यानगर, मुळ रा. भिलाई, छत्तीसगढ) यांनी फिर्याद दिली आहे. सागर रावसाहेब चोथे (रा. नागापूर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सागर चोथे याने बोल्हेगाव येथील मनप्पुरम फायनान्स शाखेचे एरीया हेड मॅनेजर सुजीतकुमार प्रसाद यांचा विश्वास संपादन केला.

चोथे याने आपले सोने इतर बँकांमध्ये तारण असल्याचे भासवले आणि ते सोडवून मनप्पुरम फायनान्सच्या बोल्हेगाव शाखेत ठेवतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने इतर बँकांच्या बनावट सोने तारण पावत्या सादर करून मॅनेजर प्रसाद यांची दिशाभूल केली. यावर विश्वास ठेवून शाखेने त्याला 15 लाख 30 हजार रूपयांचे कर्ज मंजूर केले. सदरचा प्रकार 8 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान घडला.पैसे मिळाल्यानंतर संशयित चोथे याने सोने जमा न करता मोबाइल बंद करून पळ काढला.

संशय आल्याने प्रसाद यांनी इतर बँकांमध्ये चौकशी केली असता, सागर चोथे नावाने कोणतेही सोने तारण नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुजीतकुमार प्रसाद यांनी पोलिसांत धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी संशयित सागर चोथे विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अंमलदार एस. जी. टेमकर अधिक तपास करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे