ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द…

शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही उन्हाळ्याची सुट्ट्ी मिळायची. मात्र ऐन उन्हाळ्यातही शिक्षकांना काम करावं लागणार आहे..

कारण यंदा शिक्षकांची 2 मे ते 14 जूनपर्यंतची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. आणि त्याला कारण ठरलंय. घरगणनेच्या कारणासाठी शिक्षकांनी मुख्यालय न सोडण्याबाबत सरकारने जारी केलेला आदेश. 16 मे ते 14 जूनपर्यंत जनगणनेंतर्गत घरांची यादी आणि घरगणना करायची आहे.

त्याचा पहिला टप्पा 27 एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्याचं प्रशिक्षण याच काळात होणार आहे. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी नोकरीचं ठिकाण सोडू नये.

एका बाजूला घरगणनेचा कार्यक्रम तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने 52 वर्षाच्या आतील शिक्षकांना टीईटी पास करावी लागण्याची घातलेली अट. या कात्रीत आता शिक्षक अडकलाय.. त्यामुळे घरगणनेसोबतच टीईटीचा अभ्यासही शिक्षकांना करावा लागणार आहे. मात्र शिक्षण खात्यानं शिक्षकांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द केल्या असल्या तरी त्यांना विशेष रजा देण्यात येतात, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलीय.

आता 2027 मधील जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामामुळे शिक्षकांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर घाव घातला गेलाय.. त्यामुळे शिक्षकांना टीईटी अभ्यास, कुटुंबासाठीचा वेळ आणि घरगणनेचा कार्यक्रम अशी तिहेरी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे