ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नवनाथ देवस्थान सेवा मंडळ विरुध्द बबन गणपत ढवळे यांच्या तक्रारीची चौकशी व्हावी -विश्वस्त गणेश विद्ये

अहिल्यानगर

बबन गणपत ढवळे यांनी नवनाथ देवस्थान सेवा मंडळ विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक व पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेले असून या तक्रारमध्ये उल्लेख केलेली संस्था नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट, बोल्हेगाव, अ.नगर एफ-१७० ही संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 च्या तरतुदी अन्वये स्थापन झालेली असून सदरच्या संस्थेची स्थापना सन 1972 साली कै. विजयकुमार सखाराम सुळे व कै. गंगाराम नरसय्या विद्ये यांनी स्थापन केलेली असून नाथांचा प्रचार व प्रसार करून अध्यात्मिक कार्य करणे असा उद्देश होता व आहे. प. पु. महाराज यांचा गणेश विद्ये हे निस्सीम भक्त असून या संस्थेचा हितचिंतक व विश्वस्त आहे. 

बोल्हेगाव,अहिल्यानगर येथे सदर संस्थेचे मुख्य कार्यालय असून या संस्थे मार्फत राघवेंद्र स्वामी मंदिर, देवेंद्रनाथ महाराज मंदिर, प्राथमिक शाळा, माध्यमिक विदयालय, मंगल कार्यालय याचे कामकाज पाहिले जाते. तसेच मढी, ता. पाथर्डी या ठिकाणी प. पू. देवेंद्रनाथ महाराज समाधी मंदिर आहे व त्या ठिकाणी संस्थेचे कार्यालय व भक्त निवास आहे.

संस्थे मार्फत वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. पुणे, मुंबई, नाशिक व महाराष्ट्रातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने मढीमध्ये येत असतात. मढीमध्ये येणा-या भाविक भक्तांची राहण्याची, भोजनाची व इतर सर्व व्यवस्था करण्याच्या कामासाठी संस्थेने श्री मच्छिंद्र ने हे यांची नेमणुक केलेली आहे. गेल्या २०-२५ वर्षा पासुन ते आश्रमामध्येच राहून अत्यंत कमी पगारावर प्रामाणिकपणे काम करतात.

गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेत काम करीत असल्यामुळे सर्व भाविक भक्तांचा व विश्वस्तांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झालेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षापुर्वी मढी चे आश्रमात संस्थेचे कर्मचारी श्री मच्छिंद्र ने-हे यांच्याकडे प. पु. महाराज यांच्या एका भाविक भक्ताने नाव गुपित ठेवण्याच्या अटी वर रु. 3000000/- अक्षरी तीस लाख ची रोख स्वरूपात देणगी दिल्याचे व सदरची देणगी रक्कम श्री मछिंद्र ने हे यांनी संस्थेच्या बँक खात्यामध्ये भरणा करण्यात आल्याचे सांगितले, त्याच वेळी मछिंद्र ने हे यांनी त्यांच्या भावाने त्यांच्या साठी एक चारचाकी गाडी टाटा पंच ही नवीन गाडी दिल्याचे सांगीतले .

हे गेले अनेक वर्षापासुन मच्छिंद्र ने हे यांचा मुक्काम मढीच्या आश्रमात असल्यामुळे व संस्थेचे काम अत्यंत प्रामाणिक पणे करीत असल्यामुळे अनेक भाविक भक्तांचा विश्वास त्यांनी संपादीत केलेला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीमध्ये मच्छिंद्र ने हे व इतरांनी मुंबई येथील अधिकारी व नाथ भक्त श्री अमित शिंदे यांचे नाव सांगुन व झोन उठवुन देतो असे सांगुन जानेवारी २०२३ ला रु. २०,००,०००/- अक्षरी वीस लाख , एप्रिल २०२३ ला रु.५०,००,०००/-अक्षरी पन्नास लाख व जुलै २०२३ ला रु.३०,००,०००/- अक्षरी तीस लाख असे एकुण रक्कम रुपये १,००,००,०००/- अक्षरी एक कोटी त्यांचेकडे दिले होते व मौजे टेभुर्नी, ता. खामगाव, जि. बुलढाणा येथील गट नं. ६६२ क्षेत्र १२ एकर जमीनीवर असलेले सरकारी आरक्षण (झोन) उठवुन देतो म्हणुन सदरची रक्कम घेतलेली होती असे नमुद केलेले आहे.

अशा प्रकारे नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टच्या विश्वासु कर्मचारी मच्छिंद्र ने-हे व दिगंबर मरकड यांचे विरुध्द गंभीर तक्रारींचा अर्ज दाखल झालेला असल्यामुळे व सदरचा अर्ज भाविक भक्तांच्या व्हॉटसऐप ग्रुपवर प्रसारीत झालेला असल्यामुळे राघवेंद्र स्वामी व देवेंद्रनाथ महाराज यांना मानणा-या नाथ भक्तांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली असून भाविक भक्ता मध्ये उलट सुलट चर्चा होत असल्यामुळे सदर तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल घेवुन कारवाई होणे आवश्यक आहे.

वास्तविक पाहता दिगंबर मरकड हे गुरुबंधू असून त्यांचे वडिल साहेबराव व आजोबा सुखदेव मरकड या कुटूंबियांच्या सहकार्यामुळे सदर संस्थेला मढी येथे मोठे धार्मिक कार्य करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. श्री मच्छिंद्र ने हे व दिगंबर मरकड हे अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठने त्यांनी आजपर्यंतचे सेवाकार्य करीत असताना तक्रारदार श्री ढवळे यांनी कर्मचारी मच्छिंद्र ने हे, दिगंबर मरकड व संस्थचे अध्यक्ष श्रीमती राजश्रीताई सुळे यांचे विरुध्द जे आरोप केलेले आहेत ते अत्यंत गंभीर स्वरुपाचे व प्रतिमा मलीन करणारे आहे. त्या मुळे गुरुबंधूचे, संस्थेचे व प. पु. महाराजांचे कार्याची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. या कृत्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व चिड निर्माण होत असुन अनेक भाविकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली असल्यामुळे सदर संस्थेचे विश्वस्त श्री. गणेश विद्ये यांनी अहिल्यानगर चे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे अर्ज देऊन बबन ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीमधील केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे व मोठ्या आर्थिक अपहाराचे असून या तक्रारीची सखोल व निरपेक्षपणे चौकशी करुन दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करुन संस्थेची, नाथ परिवाराची व पं. पू. महाराजांची बदनामी थांबवावी असे निवेदन दिले असून त्याची प्रत पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक परीक्षेत्र, नाशिक यांनाही पाठविले आहे. तसेच वरील प्रकरणा बाबत गुरुबंधूना काही सूचना, शंका असतील त्यांनी व्हाटस्ऍप किंवा इतर ठिकाणी चर्चा न करता संस्थेला अथवा विश्वस्त मंडळ यांना कळवावे असे आवाहन विश्वस्त श्री गणेश विद्ये यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे