ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरच्या सावकाराची दादागिरी , व्याजाच्या पैशांसाठी कामगाराला मारहाण, घरात डांबून ठेवल्याची घटना

अहिल्यानगर

व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी आलेल्या सावकाराने मालकाच्या गैरहजेरीत कामगाराला बेदम मारहाण करून घरात डांबून ठेवले. ही घटना स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे घडली.

कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घत कामगाराची सुटका केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक लाल गुगळे (रा. आनंदधाम, अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत शंभुलाल गोबालजी भिल (वय 22, मूळ रा. राजस्थान) याने पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी शंभुलाल हा भगवानलाल गुजर यांच्या चायनीज हॉटेलवर कामाला होता. गुजर यांनी संशयित दीपक गुगळे याच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मागील दोन महिन्यांचे व्याज न दिल्याने गुगळे शुक्रवारी दुपारी मालक घरी नसताना आला. त्याने शंभुलालला मालकाबाबत विचारणा करीत शिवीगाळ करता असे शंभुलाल म्हणाला.

त्याचा राग आल्याने गुगळे याने त्याला लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करून घरात ढकलले. घरात डांबून बाहेरून कुलूप लावून पळ काढला. शंभुलालने आरडाओरड केल्याने अन्य कामगार तिथे आला. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले आणि पोलिसांनी शंभुलाल सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे