ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नगरसेवक योगीराज गाडे यांचा मालमत्ता कर वाढीव मूल्यांकना विरोधात ठाम आवाज

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून अलीकडे नागरिकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर मूल्यांकन नोटिसांविरोधात नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी आज आयुक्त महोदयांना अधिकृत पत्र देत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

शहरातील अनेक नागरिकांना अचानक मोठ्या प्रमाणात वाढीव मूल्यांकनाच्या नोटिसा प्राप्त झाल्या असून यामुळे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे.

महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक ताणतणावाच्या परिस्थितीत नागरिकांवर असा अतिरिक्त करभार टाकणे अन्यायकारक असल्याचे गाडे यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक गाडे म्हणाले की,

“महानगरपालिकेने प्रथम नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा — नियमित पाणीपुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छता व्यवस्था, गटार व्यवस्था — उपलब्ध करून द्याव्यात. सुविधा अपुऱ्या असताना वाढीव मूल्यांकनाच्या माध्यमातून कर वाढवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आहे.

आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही.”पत्रामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. वाढीव मूल्यांकनाच्या सर्व नोटिसा तात्काळ स्थगित कराव्यात.पूर्वीचेच दर आणि मूल्यांकन कायम ठेवण्यात यावे.नव्याने करण्यात आलेल्या मूल्यांकन प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करावी.नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत.

गाडे यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. “जनतेवर अन्याय होणार असेल तर मी शांत बसणार नाही. नागरिकांच्या प्रत्येक घराचा प्रश्न माझ्यासाठी वैयक्तिक आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शहरातील नागरिकांनी देखील आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी पुढे यावे आणि चुकीच्या मूल्यांकनाविरोधात हरकत नोंदवावी, असे आवाहन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले आहे.

— नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे