ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सथ्था कॉलनी येथे भव्य वृक्षारोपण व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते…

सथ्था कॉलनी येथे भव्य वृक्षारोपण व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

सथ्था कॉलनी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुरेश भाऊ बनसोडे, अनिता शेटीया, सुजाता पडोळे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, यांचा सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मानपुर्वक सत्कार करण्यात आला..

झाडे लावून त्यांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे पुढील पिढी व पशुपक्ष्यांसाठी उपयोगी ठरली पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रातील 35 डोंगरांचे नामकरण करून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आगडगाव येथे विश्वस्त मंडळाशी संवाद साधून पूजेमध्ये रोप देण्याची संकल्पनाही मांडण्यात आली असून, हे रोप भक्तांनी संगोपन करावे, असा संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाचे एपिसोड महाराष्ट्रभर दाखवण्यात येणार ? असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शेवटी त्यांनी सर्व नवनिर्वाचित राष्ट्रवादी नगरसेवकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, अहिल्यानगर शहरात पुणे-मुंबईच्या धर्तीवर रुंद रस्ते, विद्युत दिवे, उद्याने, क्रीडांगणे व विविध विकासकामे सुरु आहेत.

महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रुपये खर्चाचे जिजामाता रुग्णालय उभे राहत असून,येत्या दोन ते तीन महिन्यांत त्याचे उद्घाटन होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन करण्यात येत असून, येणाऱ्या काळात अधिक गतीने विकासकामे केली जातील असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी राजेंद्र चोपडा, अमोल जाधव, आदेश चंगेडिया, गिरीश अग्रवाल, अमित पोखरणा, महेश मुनोत, विकी जगताप, केतन मुनोत, लालचंद मुनोत, विजू शेठ गुगळे, अनिल पोखरणा, लक्ष्मीभाई सावळा, दीपक अग्रवाल, प्रा. माणिक निधाते, विपुल शेटीया, गोरख पडोळे आदी मान्यवरांसह महात्मा फुले मित्र मंडळाचे पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे