ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बालक मंदिर मध्ये वार्षिक स्नेह संमेलन व कला प्रदर्शन उत्साहाने साजरे

अहिल्यानगर

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन ऋग्वेद भवन, चितळे रोड येथे आयोजित केले होते.

वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध डॉ विद्याधर पुंडे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. विलासिनी पुंडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निमंत्रित अतिथी म्हणून माननीय शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब यांची मोलाची उपस्थिती होती. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा. श्री जुबेर पठाण साहेब हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच माजी मनपा पर्यवेक्षक श्री. एन आर पठाण सर व सामाजिक कार्यकर्त्या छायाताई राजपूत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आलेल्या सर्व पाहुण्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे सांगितले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापकांनी अतिशय नियोजनबद्ध व उत्साहाने केले होते. असे प्रमुख पाहुणे म्हणाले. माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी येथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर आपण जे उत्तम शैक्षणिक संस्कार करणार आहोत त्याचाच पुढे भावी आयुष्यात त्यांना उपयोग होणार आहे असे आवर्जून सांगितले. मिशन आरंभच्या परीक्षांमधून या विद्यार्थ्यांची तयारी होऊन त्यातूनच भावी डॉक्टर इंजिनिअर कलेक्टर बनणार आहेत.

महिला मंडळ शाळेच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई केसकर यांनी आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी बसवलेल्या कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले .सर्व कार्यक्रमांना बक्षिसे जाहीर केली. परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष श्री करंदीकर तसेच स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर अरुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट तयारीबद्दल मुख्याध्यापकांचे कौतुक केले.

यावर्षी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची थीम चातुर्मासी हर्ष मानसी अशी होती. यामध्ये वारकरी दिंडी पासून सुरुवात होऊन खंडोबाच्या गोंधळापर्यंत सर्व सणांवरील विविध कार्यक्रम अतिशय मेहनत उत्कृष्ट साजरे झाले.

पर्यावरणावर आधारित नाटिकेचाही उल्लेखनीय सहभाग होता. माजी विद्यार्थी संघाचे डॉ. कीर्ती कोल्हे आणि दीपक धाडगे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमांना बक्षिसे जाहीर केली.

स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीचे प्रदर्शन व कला प्रदर्शन भरवले होते. रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन माननीय श्रीमती स्वाती महेंद्र कुलकर्णी यांनी केले. तसेच कला प्रदर्शनाचे उदघाटन सप्तरंग प्रिंटवर्ल्डचे संचालक मा. श्री नंदेश शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून सुंदर असे वैविध्यपूर्ण चित्रकला व हस्तकलेच्या वस्तू व आकर्षक रांगोळ्या सादर केल्या. याचे कौतुक पाहुण्यांनी केले व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मेंद्रे आणि मुग्धा घोटणकर यांनी केले .आभार निरुपमा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा कुलकर्णी,अश्विनी मेंद्रे वैशाली सातपुते ,ठकु तरटे, सीमा कवाष्टे ,सुकन्या बोल्ली, विद्या ओहळ, हेमांगी भिडे, मुग्धा घोटणकर, प्रणाली पाठक, रागिणी सूर्यपुजारी, बेबी ढोणे यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे