ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातील जून्या इमारतीला भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बुरूड गल्ली (बांबू गल्ली) येथील एका जून्या इमारतीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत इमारत पूर्णतः भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे.

बांबू गल्ली येथील आनंद चंगेडिया यांच्या मालकीच्या जून्या इमारतीला मंगळवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे.

संपूर्ण सागवान लाकडाच्या या इमारतीला आग लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे आणि धूराचे लोळ बाहेर पडत होते. आग लागल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर इमारत ही १९३७ चे बांधकाम आहे. संपूर्ण कांडा दांडाची इमारत आहे. तीला सकाळी सात वा. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

महापालिका अग्निशमन दलाने अटोकाट प्रयत्न करून आग विझवलेली आहे. आगी जीवितहानी हानी टळलेली आहे मात्र इमारत मालक चंगेडिया यांची मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे