ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात लिव्ह-इन संबंधातील वादातून तरूणीला धमक्या

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरूण-तरूणीमध्ये झालेल्या वादातून तरूणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवारी (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता, कजबे वस्ती येथे राहत असलेल्या 30 वर्षीय पीडित तरूणीने रविवारी दुपारी फिर्याद दिली आहे. गणेश चितळे (पूर्ण नाव माहिती नाही, वारूळाचा मारूती, नालेगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चितळे याच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गणेशने फिर्यादीला वारंवार फोन करून शिवीगाळ केली तसेच मी तुला बघून घेईन अशा स्वरूपाची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, पीडितेने घडलेला प्रकार तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गणेश चितळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे