ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मागितली २ लाख खंडणी. कार्यालयाची तोडफोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर

प्रतिनिधी उर्जा प्रकल्पांवर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबावतंत्र वापरण्याची मालिका थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सौर उर्जा प्रकल्पात अलिकडेच घडलेले सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खंडणी प्रकरण, त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असतानाच पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अगदी तशीच घटना घडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार हा या गुन्हयातील मुख्य आरोपी असून त्याच्यासोबतच्या ७-८ जणांच्या टोळक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दशहत माजवली. दरोडीतील सेनवियान पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास लाथा बुक्क्यांनी केलेली अमानुष मारहाण, कार्यालयात घुसून केलेली तोडफोड आणि दरमहा दोन लाखांच्या खंडणीची उघड मागणी केली.

१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले रा. कारेगांव, ता. पारनेर येथील रहिवासी दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना मुख्य आरोपी विकास पवार हा अचानक कार्यालयात शिरला. घुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार पवार याने गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या हातातील कोयता थेट गळयाजवळ रोखून धमकावले की, तू येथे कसे काम करतोस ? तुला सांगूनही तू कंपनी बंद का ठेवली नाहीस असा जाब पवार याने विचारला.

पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ ७ ते ८ जणांची टोळी दांडकी, दगडांसह कार्यालयात धडकली. त्यांनी अक्षरशः धुडगूस घालत कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या, संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टमची तोडफोड करून नुकसान केले. सिक्युरिटी गार्ड घुले याचा मोबाईल घेऊन तो फोडून टाकला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे