ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली युवाशक्ती च्या वतीने वंचित,वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना फराळ वाटप

अहिल्यानगर

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दिवाळी निमित्त नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी, नवीन गाडी खरेदी अशी लगबग सगळ्याच घरांमधून पाहायला मिळत असते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची दिवाळी च्या सणासाठी मोठी तयारी करताना दिसतातपरंतु काही घर अशी पण असतात त्यांना एक वेळचे जेवण मिळणे देखील कठीण असते ज्यांना घरातील कोणी नवीन वस्तू आणणारे नसतात, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे देखील कोणी नसतात त्यांना फराळाचे वाटप करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट चे युवक सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी जाऊन फराळ पोहोच करतात.

मागील १० वर्षा पासून फराळ पोहोच करण्याचे कार्य ट्रस्ट कडून केले जाते असे पद्मशाली युवाशक्तीचे श्रीनिवास इप्पलपेल्ली यांनी सांगितले.

दरवर्षी न चुकता पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट कडून दिवाळी च्या दिवशी वंचीत वृद्धांना फराळ दिल्यामुळे आम्हाला आमच्या माहेरहून दिवाळी च्या शुभेच्छा घरापर्यंत पोहोच झाल्यात असे वंचित वृध्द महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

या वेळी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट चे योगेश म्याकल,अजय म्याना, दिपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश ताटी, सागर बोगा, सागर आरकल, नरेश कोटा,विराज म्याना, वेदांत म्याना उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे