ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच, महिला एसीबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर

शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या स्वीकारलेल्या लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करून तिला १८ हजार रुपयांसह रंगेहाथ पकडले. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

एका तक्रारदाराने आपल्या १९ वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जून महिन्यात जिल्हा समितीकडे अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्याने तो चिंतेत होता. ऑनलाइन अर्जाची चौकशी करताना श्रीसाई सायबर कॅफेतील कर्मचार्‍याने त्याला आरोपी महिलेचा संपर्क दिला. तिने प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला २० हजार रुपयांची मागणी केली, जी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी असल्याचे सांगितले.तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली.

पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने व्हॉइस रेकॉर्डरचा वापर करून पडताळणी केली. नोबेल हॉस्पिटल, रॉयल हॉटेल आणि इतर ठिकाणी झालेल्या चर्चेत महिलेची लाच मागणी स्पष्ट झाली. तिने अखेर १८ हजार रुपयांवर तडजोड केली आणि वरून प्रेशर आहे, लगेच काम करून देती असे सांगितले.

लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराने ९,५०० रुपयांच्या खर्‍या नोटा आणि ८,५०० रुपयांच्या बनावट नोटांवर पावडर लावली. दोन शासकीय पंचांसह तक्रारदाराने महिलेला सिटी प्राइड हॉटेलजवळ बोलावले. जुना पिंपळगाव रोडवरील चेतन हॉस्पिटल रोडवर महिलेच्या हातात १८ हजार रुपये दिले.

त्यानंतर लाचलुचपत पथकाने सदर महिलेला ताब्यात घेतले.आरोपी महिलेचे नाव उषा मंगेश भिंगारदिवे (वय ३३, रा. प्लॉट नं. १०३, श्रीनाथ कॉम्प्लेस, भिस्तबाग चौक) असून, ती खाजगी महिला आहे. तिने ही रक्कम जात पडताळणी कार्यालयातील १०-१५ जणांसाठी मागितल्याचे कबूल केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे