ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा पहिला झटका – वोकल फॉर लोकल मंत्रासाठी माझी साथ द्या आणि याच्यासोबत उभे राहा.

भारतातील अमेरिकन कंपन्यांचे दिवाळे निघणार

भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टीका करताना दिसत आहे. त्यांनी भारताची सुटका टॅरिफमधून होणार नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच दिल्ली येथे होणाऱ्या व्यापार करारची बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताच्या विरोधात आग ओकत आहेत. या टॅरिफ वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत मोठा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. पंतप्रधानांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरीही भारत झुकणार नाहीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफच्या मुद्दावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होताना दिसतंय.

नरेंद्र मोदी हे आज दिल्ली एनसीआर येथील राजमार्गाचे उद्धाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळीच्या भाषणात त्यांनी म्हटले की, तुम्ही भारताचेच प्रोडक्ट खरेदी करा. आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. वोकल फॉर लोकल मंत्रासाठी माझी साथ द्या आणि याच्यासोबत उभे राहा.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे