ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उत्सावाला गालबोट..दहीहंडीमध्ये 2 गोविंदाचा मृत्यू तर 99 गोविंदा जखमी

राज्यभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळालाय. परंतु राज्यातील काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल आहे. दहीहंडीच्या उत्सवात गोविदांची सुरक्षा वा-यावर असल्याची पाहायला मिळाली.

कारण शनिवारी मानखूर्दमध्ये 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तर 100 हून अधिक गोविंदा हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीची दोरी बांधताना पथकातील एक सदस्य खाली पडला. जखमीला ताबडतोब गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की त्या तरुणाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले.

दरम्यान, दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. दरवर्षी सुरक्षा कवच म्हणून गोविंदांचा विमा ही काढण्यात येतो . यावर्षी तर तब्बल दीड लाख गोविंदाचे विमा उतरवण्यात आलेत. मात्र त्याच्या सुरक्षेसाठी ठोस अशी पावलं का उचलली जात नाही? असा सवाल दहीहंडी उत्सवात झालेल्या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे