ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

हिरकणी सौ.अनिता गुजर यांनी त्यांच्या नातीसाठी कवितास्वरुपात शुभेच्छापत्र..

डोंबिवली

हिराण्या राहुल गुजर….

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा हिरण्या ..

जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी

तशी नाजूक, देखणी हिरण्या आहे सोनसळी

यावी पुनवेच्या राती जशी शकुनचाहूल,

तसं अंगणी भावाच्या तिचं इवलं पाऊल

हसू तिचं जशी बरसावी वळवाची सर,

चांदण्याची गोड खळी गोबऱ्याशा गालांवर

ओठी घेऊन आली ती गोड चैतन्याची गाणी

जसं पहाटेचं स्वप्न, जशी परीची कहाणी…

लाडाकोडात वाढली माझी लेक कौतुकाची,

आली जाण छकुलीला मायबापाच्या सुखाची..

देवा, माझ्या चिमणीला लाभो आनंदी घर,

मिळो अतोनात प्रेम, देई एवढाच वर..

औक्ष लाभू दे उदंड, आहे आमची लाडाची परी

जन्मोजन्मी लेक होऊन ती गुजरांच्या घरी…

तुझी लाडकी आजी

हिरकणी सौ.अनिता गुजर..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे