ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मानखुर्द आणि देवनार परिसरातून सात किलो गांजा सह तिघांना अटक.

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मुंबई गांजाचा साठा असलेल्या तीन ठिकाणी मानखुर्द आणि देवनार पोलिसांनी छापा टाकून एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. त्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सात किलो गांजा जप्त केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

गोवंडी-शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी वाढली असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे.

त्यानुसार गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पोलिसांनी मानखुर्द आणि देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपीना अटक केली आहे.राजू चौधरी (२५), इसाक शेख (४८) आणि अब्दुल शेख (३४) अशी या अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

त्यातील राजू याच्याकडून पोलिसांनी चार किलो गांजा, तर इसाक याच्याकडून दोन किलो आणि अब्दुल याच्याकडून एक किलो असा एकूण सात किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

येणाऱ्या काही दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे